यावल महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:18 IST2021-08-15T04:18:38+5:302021-08-15T04:18:38+5:30

अध्यक्षस्थान प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांनी भूषविले. प्रास्ताविकात प्रा.एस.आर. गायकवाड यांनी नामविस्तार दिन साजरा करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. सदर कार्यक्रमात ...

University Name Expansion Day celebrated at Yaval College | यावल महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा

यावल महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा

अध्यक्षस्थान प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांनी भूषविले. प्रास्ताविकात प्रा.एस.आर. गायकवाड यांनी नामविस्तार दिन साजरा करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. सदर कार्यक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपप्राचार्य प्रा.एम.डी. खैरनार यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनाविषयी माहिती दिली. प्रा.प्रवीण पाटील यांनी बहिणाबाईंच्या काव्यावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात डॉ.संध्या सोनवणे यांनी बहिणाबाईंच्या कवितेतील भावमयता, आशयघनता ही साहित्यिक वैशिष्ट्ये स्पष्ट केली.

सूत्रसंचालन डॉ.सुधा खराटे यांनी केले. आभार डॉ.एस.पी. कापडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी उपप्राचार्य प्रा.अर्जुन पाटील, प्रा.संजय पाटील, डॉ.पी.व्ही पावरा, डॉ.एच.जी. भंगाळे, मिलिंद बोरघडे यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: University Name Expansion Day celebrated at Yaval College