परीक्षेच्या अडचणी, कोठे साधावा संपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 13:20 IST2020-07-12T12:58:33+5:302020-07-12T13:20:51+5:30
समस्या सोडवण्यासाठी क्रमांक प्रसिद्ध

परीक्षेच्या अडचणी, कोठे साधावा संपर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि विद्यापीठ प्रशाळामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून विद्यार्थी सहायता केंद्राची स्थापना करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या परीक्षा विषयक अडचणींचे निराकरण करण्यासाठी या केंद्रात अभ्यासक्रमनिहाय स्टुडंट हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे़
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये व प्रशाळांतील विद्यार्थ्यांना ई-सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत विद्यापीठाने एम.के. सी.एल. सोबत सामंजस्य करार केला आहे. या करारांतर्गत विद्यार्थी सहायता केंद्राची स्थापना करुन विद्यार्थ्यांना ई सुविधा खाते, परीक्षा अर्ज सादर करण्याची तारीख, परीक्षेचे वेळापत्रक, निकालाच्या संभाव्य तारखा, त्रुटी निराकरण, विविध प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याची कार्यपध्दती, शैक्षणिक पात्रता विषयक कामकाजाची परीपत्रके, सूचना, महाविद्यालय व विद्यार्थ्यांकरिता विविध नमुनापत्रे आदी माहिती उपलब्ध करुन दिली जाते. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षा विषयक शंकांचे निरसन करण्यासाठी अभ्यासक्रम निहाय हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहे़
हेल्पलाईन क्रमांक पुढील प्रमाणे,
लॉ, एम.फार्मसी, एम.एफ.ए., एम.ए.या परीक्षांकरिता ९४०३००२०४२, बी.कॉम, युजी मॅनेजमेंट, एज्युकेशन, एम.ई. या करीता ९४०३००२०१५, बी.ए., बी.ए. एम.सी.जे., बी.आर्च, एम.एस.डब्ल्यु., बी.ई. याकरिता ९४०३००२०१८, बी.व्होक, बी.एस्सी., एम.एस्सी., एम.सी.ए., पी.जी.मॅनेजमेंट या करीता भ्रमणध्वनी क्रमांक ९३०३००२०५४, बी.एस.डब्ल्यु., बी.टेक. कॉस्मॅटीक, बी.फार्मसी, बी.एफ.ए., एम.कॉम. या करीता ९३०३००२०२४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साध्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे़