शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

चाळीसगाव येथे कोरोनाना मृत पावलेल्या पोलिकचे पोलिसांना अनोखी श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 9:25 PM

चाळीसगाव : कोरोना आजाराशी झुंज देतांना मृत पावलेले चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक गोपाळ भोई यांना स्वातंत्र्यदिनी शनिवारी अनोखी ...

चाळीसगाव : कोरोना आजाराशी झुंज देतांना मृत पावलेले चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक गोपाळ भोई यांना स्वातंत्र्यदिनी शनिवारी अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या स्मरणार्थ पोलिस स्टेशन व दृष्टी फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात ७५ रक्त पिशव्यांचे संकलन झाले असून स्वतः आमदार मंगेश चव्हाण यांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले. पोलिस नाईक गोपाळ विठ्ठल भोई यांचा नुकताच कोरोनाने मृत्यू झाला. तरुण पोलिस बांधवाचा मृत्यू झाल्याने शहर परिसरात हळहळ व्यक्त झाली. गोपाळ भोई यांचा मनमिळावू स्वभाव आणि त्यांचा झालेला दूर्वेवी मृत्यू याच्या तीव्र संवेदना समाज माध्यमावर व्यक्त झाल्या.त्यांच्या स्मरणार्थ कोरोना काळात गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध व्हावे. त्यांची फरफट होऊ नये. यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले. याला चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे महिलांनी देखील रक्तदान केले. यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते उद्धवराव महाजन, खादी ग्रामोद्योग संस्थेचे चेअरमन किसनराव जोर्वेकर, तालुका वृत्तपत्रकार मंडळाचे अध्यक्ष आर.डी.चौधरी, पालिकेचे गटनेते संजय रतनसिंग पाटील, नगरसेवक अरुण अहिरे, एम.बी.पाटील, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे, सुनील निकम, बबन पवार, अरुण पाटील, दृष्टी फाऊंडेशनचे वामन पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते. गरजू रुग्णांनी रक्तासाठी पोलिस स्टेशनशी संर्पक करावा असे आवाहन करण्यात आले आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी लाईफ सेव्हर गृपचेही सहकार्य लाभले.

टॅग्स :Jalgaonजळगाव