रेल्वेच्या धडकेत अनोळखी तरुण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:16 IST2021-03-26T04:16:21+5:302021-03-26T04:16:21+5:30

ओळख पटेना : रेल्वे स्टेशननजीकची घटना जळगाव : धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने २५ ते २७ वयोगटातील तरुणाचा जागीच मृत्यू ...

An unidentified youth was killed on the spot in a train collision | रेल्वेच्या धडकेत अनोळखी तरुण जागीच ठार

रेल्वेच्या धडकेत अनोळखी तरुण जागीच ठार

ओळख पटेना : रेल्वे स्टेशननजीकची घटना

जळगाव : धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने २५ ते २७ वयोगटातील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव रेल्वे स्थानकाजवळ मुंबई मार्गाच्या आउटरवर गुरुवारी पहाटे तीन वाजता घडली.

या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे तीन वाजता २५ ते २७ वयोगटातील हा तरुण आउटरच्या दिशेने रस्ता ओलांडत असताना धावत्या रेल्वेचा त्याच्या डोक्याला फटका बसला. त्यात डोक्याचा पूर्णतः चेंदामेंदा झालेला आहे. त्यामुळे हा तरुण जागीच गतप्राण झाला. स्टेशन मास्तरकडून माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवला. दरम्यान, हा तरुण जळगाव शहरातीलच असण्याची शक्यता आहे. मद्याच्या नशेत रस्ता ओलांडताना ही घटना घडली असावी. आत्महत्येच्या दृष्टीनेही तपास केला जात आहे. मृतदेहाची ओळख पटल्यावरच अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. तरुणाच्या अंगात पिवळ्या रंगाचा शर्ट व जीन्स पॅन्ट आहे. ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: An unidentified youth was killed on the spot in a train collision