अज्ञात चोरट्याने चहार्डी शाळेतील कागदपत्रे जाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:22 IST2021-08-28T04:22:12+5:302021-08-28T04:22:12+5:30

चोपडा : तालुक्यातील चहार्डी येथील भाऊसाहेब शा. शि. पाटील विद्यालयाच्या कार्यालयाचे कुलूप तोडून दोन कपाटातील ...

An unidentified thief burned Chahardi school documents | अज्ञात चोरट्याने चहार्डी शाळेतील कागदपत्रे जाळली

अज्ञात चोरट्याने चहार्डी शाळेतील कागदपत्रे जाळली

चोपडा : तालुक्यातील चहार्डी येथील भाऊसाहेब शा. शि. पाटील विद्यालयाच्या कार्यालयाचे कुलूप तोडून दोन कपाटातील कागदपत्रे जाळण्यात आली. तर संगणकाचा सीपीयू घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. गुरुवारी पहाटे तीन ते सहा वाजेदरम्यान हा प्रकार घडला.

विद्यालयाचे प्राचार्य व्ही. आर. सोनवणे यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनरल रजिस्टर आणि कागदपत्रे जाळून अज्ञात भामट्याला मिळणार तरी काय? पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनेच चोरट्याने हा प्रकार केला असावा आणि घटनेमागे माहीतगाराचा हात असल्याचे बोलले जात आहे.

घटनेची माहिती चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण यांना माहिती झाल्यानंतर त्यांनी तत्काळ जळगावहून श्वान पथकास पाचारण केले. या श्वानाने विद्यालयाच्या बंद गेटपर्यंत माग दाखविला. चहार्डी बीडचे पोलीस मधुकर पवार यांनी सदर घटनेचा पंचनामा केला.

Web Title: An unidentified thief burned Chahardi school documents