दुर्दैवी ! खेळता-खेळता विजेचा धक्का लागून चिमुकलीचा मृत्यू, कुटुंबीयांचा आक्रोश
By सागर दुबे | Updated: March 20, 2023 17:14 IST2023-03-20T17:14:00+5:302023-03-20T17:14:52+5:30
निमखेडी गावातील घटना ; रूग्णालयात कुटूंबियांचा मनहेलवणारा आक्रोश

दुर्दैवी ! खेळता-खेळता विजेचा धक्का लागून चिमुकलीचा मृत्यू, कुटुंबीयांचा आक्रोश
जळगाव : घरासमोर खेळता-खेळता लोमकळलेल्या वीजवाहक तारेला हात लागून शॉक बसल्याने धनवी महेंद्र बाविस्कर (०५, रा. निमखेडी) या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास निमखेडी गावातील दत्त मंदिराजवळ घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून बाविस्कर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
निमखेडी गावातील दत्त मंदिराजवळ महेंद्र पाटील हे कुटूंबासह वास्तव्यास आहेत. हातमजुरी करून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास त्यांची मोठी मुलगी धनवी ही गल्लीतील काही मुला-मुलींसोबत घरासमोर खेळत होती. जवळच ट्रॅक्टर उभे होते. त्या ट्रॅक्टरवर ती खेळत असताना तिचा वारा-वादळामुळे लोमकळलेल्या वीजवाहक तारेला स्पर्श झाला आणि क्षणीच तिला विजेचा मोठा धक्का बसला अन् तिचा जागीचा मृत्यू झाला.