रमाई आवास योजनेतंर्गत जिल्ह्यात सात हजार घरकुले पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 16:52 IST2018-02-20T16:50:21+5:302018-02-20T16:52:39+5:30
रमाई आवास योजनेतंर्गत जिल्ह्यात मंजूर असलेल्या ९ हजार ५३८ घरकुलांपैकी ७ हजार २४० घरकुले पूर्ण झाली आहे. यासाठी ५३ कोटी ३५ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यातील विविध यंत्रणामार्फत खर्च करण्यात आला आहे.

रमाई आवास योजनेतंर्गत जिल्ह्यात सात हजार घरकुले पूर्ण
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२० - रमाई आवास योजनेतंर्गत जिल्ह्यात मंजूर असलेल्या ९ हजार ५३८ घरकुलांपैकी ७ हजार २४० घरकुले पूर्ण झाली आहे. यासाठी ५३ कोटी ३५ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यातील विविध यंत्रणामार्फत खर्च करण्यात आला आहे.
जिल्हा सामाजिक विकास शक्ती प्रदत्त समितीची सभा निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त खुशाल गायकवाड, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बबीता कमलापूरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जयकर उपस्थित होते.
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवगार्तील विद्यार्थ्यांना शासनातर्फे देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी संबंधित महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांचे अर्ज तातडीने प्राप्त करुन घ्यावे. तसेच समाजकल्याण विभागाने नियमानुसार आवश्यक ती सर्व कार्यवाही तातडीने पूर्ण करुन विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्याची सूचना मुंडके यांनी केली.
या बैठकीत शासकीय वसतीगृह, निवासी शाळा, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आधारकार्डचे वाटप, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, शिष्यवृत्ती वाटप, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, रमाई आवास योजना, अनुसूचित जाती उपयोजनांचा आढावा घेण्यात आला.
शासकीय वसतीगृह, निवासी शाळा, आश्रमशाळेतील १७ हजार २४८ विद्यार्थ्यांना आधारकार्डचे वाटप करण्यात आले आहे. तर अनिवासी आश्रमशाळेतील ३३४ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड प्रलंबित आहे. तसेच शासकीय वसतीगृहातील ५४८ विद्यार्थ्यांची दुसºया सत्रातील तर ८ आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी प्रलंबित असल्याची माहिती साहाय्यक आयुक्त गायकवाड यांनी बैठकीत दिली.