ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 19:10 IST2019-05-10T19:09:59+5:302019-05-10T19:10:53+5:30
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या मुक्ताईनगर तालुकाध्यक्षपदी मोहन मेढे, तर उपाध्यक्षपदी धनंजय रामदास सापधरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड
मुक्ताईनगर, जि.जळगाव : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या मुक्ताईनगर तालुकाध्यक्षपदी मोहन मेढे, तर उपाध्यक्षपदी धनंजय रामदास सापधरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची बैठक येथील शासकीय विश्रामगृहात झाली. महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्य तथा जिल्हाध्यक्ष विकास महाजन अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी जिल्हा ग्राहक पंचायत समिती समितीवरील अशासकीय सदस्य अ.फ. भालेराव हे प्रमुख उपस्थित होते.
नूतन कार्यकारिणीत तालुका संघटक बी.जे.माळी, संघटक छबिलदास पाटील, सचिव लक्ष्मण चौके यांच्यासह सचिव सुजाता इंगळे, महिला आघाडीप्रमुख वंदना गायकवाड, कोषाध्यक्ष प्रशांत तायडे, प्रसिद्धीप्रमुख कैलास कोळी, सदस्य युवराज घटे, गोपाळ बेलदार, दिनकर पाटील यांचा समावेश आहे.