गावाला काकांचा मृत्यू इकडे घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:12 IST2021-06-11T04:12:18+5:302021-06-11T04:12:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेंदालाल मील येथे गौरव सतिश राणे यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी ३५ ...

Uncle's death in the village, burglary here | गावाला काकांचा मृत्यू इकडे घरफोडी

गावाला काकांचा मृत्यू इकडे घरफोडी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेंदालाल मील येथे गौरव सतिश राणे यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी ३५ हजार रुपये रेाख आणि दागिने लंपास केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल झाला आहे.

गौरव राणे यांचा साऊंड सिस्टीमचा व्यवसाय असून गेंदालाल मीलमधील संभाजी चौकात ते वास्तव्याला आहेत. गौरव यांचे काका गजानन प्रताप राणे (रा.रामानंदनगर) यांचे सेामवार ७ जून रोजी भडगाव येथे निधन झाले. माहिती मिळताच गौरव कुटुंबीयांसह घरबंद करुन काकांच्या रामानंदनगर येथील घरी गेले होते. भडगाव येथून मृतदेह आणल्यानंतर जळगावी त्यांच्यावर अंत्यसस्कार करण्यात आले. त्यामुळे गौरव यांचे कुटुंबीय रामानंदनगर येथेच थांबून होते. अंत्यविधी आटोपून बुधवारी सकाळी ८ वाजता ते घरी पोहचले असता घराला लावलेले कुलूप तूटलेल्या अवस्थेत खाली पडलेले होते. घरात सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले आढळून आले. कपाटाचे कूलूप तोडून चोरट्यांनी ३५ हजार रुपये रोख सेान्याचे लहान पेंडल, चांदीच्या साखळ्या, असा ४५ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचेही आढळून आले. चोरीची खात्री झाल्यावर गौरव राणे यांनी रात्री शहर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन चोरट्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Uncle's death in the village, burglary here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.