Winner : जळगाव लोकसभा मतदार संघातून उन्मेष पाटील तर रावेरमधून रक्षा खडसे विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 21:47 IST2019-05-23T21:47:11+5:302019-05-23T21:47:30+5:30
जळगाव जिल्ह्यात भाजपची विजयी घौडदौड कायम

Winner : जळगाव लोकसभा मतदार संघातून उन्मेष पाटील तर रावेरमधून रक्षा खडसे विजयी
जळगाव : जळगाव आणि रावेर अशा दोन्ही जागा राखत जळगाव जिल्ह्यात भाजपने विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. जळगावातून आमदार उन्मेष पाटील यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले तर रावेरमधून खासदार रक्षा खडसे ह्या दुसऱ्यांदा लोकसभेत पोहचल्या आहेत.
जळगाव मतदार संघातून भाजपचे आमदार उन्मेष पाटील हे ४ लाख ११,६१७ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले. पाटील यांना ७ लाख १३,८७४ तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना ३ लाख २,२५७ मते मिळाली.
रावेर मतदार संघातून भाजपच्या खासदार रक्षा खडसे ह्या तीन लाख ३५,८८२ मतांची आघाडी घेऊन विजयी झाल्या. त्यांना ६ लाख ५५,३८६ तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांना ३ लाख १९५०४ मते मिळाली आहेत.