अपघातात जखमी झालेल्या उमाळ्याच्या तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 13:30 IST2020-08-23T13:30:39+5:302020-08-23T13:30:39+5:30
जळगाव : कंपनीतून घरी येताना उमाळा ते गाडेगाव दरम्यान झालेल्या अपघातात जखमी झालेल्या राजेंद्र उर्फ पिंटू माणिक चव्हाण (रा.उमाळा, ...

अपघातात जखमी झालेल्या उमाळ्याच्या तरुणाचा मृत्यू
जळगाव : कंपनीतून घरी येताना उमाळा ते गाडेगाव दरम्यान झालेल्या अपघातात जखमी झालेल्या राजेंद्र उर्फ पिंटू माणिक चव्हाण (रा.उमाळा, ता.जळगाव) या तरुणाचा शनिवारी सकाळी पावणे सात वाजता उपचार सुरु असताना मृत्यू झाला. राजेंद्र हा गाडेगाव येथील सुप्रीम कंपनीत कामाला होता. पंधरा दिवसापूर्वी कंपनीतून दुचाकीने घरी येत असताना मागून आलेल्या चारचाकी वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली होती. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. राजेंद्र याच्या पश्चात आई सुमनबाई, वडील माणिक तुळशीराम पाटील,पत्नी अश्विनी, मुलगी खुशी, भाऊ विजय,वहिनी शारदा असा परिवार आहे.