उज्ज्वला पुन्हा चुलीवर, गॅस सिलिंडर कसे भरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:21 IST2021-08-25T04:21:46+5:302021-08-25T04:21:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : गाजावाजा करून ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या लोकांना स्वयंपाकाचा मोफत गॅस देण्यासाठी केंद्र सरकारने ...

Ujjwala on the stove again, how to fill the gas cylinder? | उज्ज्वला पुन्हा चुलीवर, गॅस सिलिंडर कसे भरणार?

उज्ज्वला पुन्हा चुलीवर, गॅस सिलिंडर कसे भरणार?

लोकमत न्यूज नेटवर्क

भुसावळ : गाजावाजा करून ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या लोकांना स्वयंपाकाचा मोफत गॅस देण्यासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गॅस कनेक्शन मोफत मिळत असले तरी सिलिंडर महागल्याने सर्वसामान्यांना परवडत नसल्याचे चित्र आहे. अनुदानही जवळपास बंदच झाल्याने उज्ज्वला योजनेचे ग्रामीण भागातील लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचे चित्र आहे.

‘बजेट’ कोलमडतेय स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रत्येक महिन्याला वाढतच असून, यामुळे सर्वांचेच ‘बजेट’ कोलमडत आहे. त्यात पगारदार, व्यावसायिकही चिंतित असताना अल्पउत्पन्न असणाऱ्यांसमोर तर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. स्वयंपाकासाठी महिलांना वणवण भटकंती करीत सरपण जमा करावे लागते व धुराचा सामना करीत चूल पेटवावी लागत आहे. महागाईत गॅस सिलिंडरचीही भर पडली आहे. सध्या सिलिंडर ८६५ रुपयांना मिळत असून, अनुदान बंद झाल्यातच जमा असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.

गॅस सिलिंडर दरात झालेली वाढ

जानेवारी २०१९ -६९२

जानेवारी २०२० - ७१४.५०

जानेवारी २०२१ - ६९९

ऑगस्ट २०२१ - ८६४.५०

अत्यल्प मिळते अनुदान

गॅस सिलिंडरवर आधी २०० ते २५० रुपये अनुदान मिळत होते. त्यामुळे, गॅस सर्वसामान्यांच्या आवाक्यात होता. मात्र, आता सिलिंडरचे दर वाढलेले असताना केवळ २ ते ३ रुपये खात्यात जमा होत आहे. या अनुदानासाठी ग्राहकांना बँकेचे खाते काढावे लागत आहे. त्यासाठी बँकेत काही रक्कम डिपॉझिट ठेवावी लागते. त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

सिलिंडर भरणे कसे परवडणार?

काही महिन्यांपासून सिलिंडरचे भाव वाढतच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. आधीच कोरोनामुळे अनेकांवर आर्थिक संकटे आलेली असताना त्यातच सिलिंडरचे भावही वाढले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने गॅसचे दर कमी करावे.

- उज्ज्वला पाटील, गृहिणी, भुसावळ

सिलिंडरचे भाव १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. दुसरीकडे अनुदान मात्र नसल्यासारखेच झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने गॅसचे दर कमी करावे. तसेच अनुदान वाढविण्याची गरज आहे.

-कल्पना चौधरी, गृहिणी, भुसावळ

कोरोनामुळे गतवर्षीपासून सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच महागाई वाढल्याने अनेकांचे नियोजन बिघडले आहे. गॅसचे भावही दुपटीने वाढले असून, मिळणारे अनुदानही बंदच झाले आहे. त्यामुळे सिलिंडरचे वाढलेले भाव कमी करण्याची गरज आहे.

- अश्विनी विनय परदेशी, गृहिणी, भुसावळ

Web Title: Ujjwala on the stove again, how to fill the gas cylinder?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.