उज्ज्वला गॅस योजना या महिन्यापासून होणार पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:12 IST2021-06-11T04:12:19+5:302021-06-11T04:12:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्र सरकारने राबविलेले प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना पावणे दोन वर्षानंतर पुन्हा एकदा सुरू होत ...

उज्ज्वला गॅस योजना या महिन्यापासून होणार पुन्हा सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केंद्र सरकारने राबविलेले प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना पावणे दोन वर्षानंतर पुन्हा एकदा सुरू होत आहे. या योजनेसाठी अर्ज भरणे सुरू झाले असून जिल्ह्यातील जवळपास इच्छुक लाभार्थ्यांना याचा लाभ होऊ शकणार आहे.
दारिद्रय रेषेखालील महिलांना मोफत घरगुती एलपीजी गॅस उपलब्ध करुन देत पांरपारिक पद्धतीने स्वयंपाक करताना धुरामुळे डोळ्यांवर व शरीरावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला गॅस योजना सुरू केली होती. जिल्ह्यात १ मे २०१६ ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत ही योजना राबविली गेली. याअंतर्गत जिल्ह्यातील लाखो महिलांना मोफत कनेक्शन देण्यात आले. १ ऑक्टोबर २०१९ पासून ही योजना बंद झाली. त्यानंतर आता केंद्र सरकार देशभरात ही योजना पुन्हा सुरु करीत असून जिल्ह्यातील महिलांना याचा लाभ होणार आहे.
यासाठी इच्छुक लाभार्थ्यांना आपल्या परिसरात असलेल्या गॅस एजन्सी ठिकाणी अर्ज करून द्यायचा आहे.
योजनेसाठी निकष
अर्ज सादर करताना अर्जदाराला आपले संपूर्ण नाव, पत्ता, आधार कार्ड नंबर, जन-धन बँक खात्याचे नंबर देणे बंधनकारक राहणार आहे. सोबतच बीपीएल प्रमाणपत्र, बीपीएल रेशन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे. अर्ज सादर करताना अर्जदार वयाची १८ वर्षे पूर्ण केलेला असावा.