वीजेचा शॉक लागून दोन वायरमनचा मृत्यू; फत्तेपूरात दिवाळीच्या दिवशी घडली घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2022 16:00 IST2022-10-24T15:59:50+5:302022-10-24T16:00:53+5:30
वीजेचा शॉक लागून वीज वितरणच्या दोन वायरमनचा मृत्यू झाला.

वीजेचा शॉक लागून दोन वायरमनचा मृत्यू; फत्तेपूरात दिवाळीच्या दिवशी घडली घटना
आर.एस.पाटील, फत्तेपूर जि. जळगाव: वीजेचा शॉक लागून वीज वितरणच्या दोन वायरमनचा मृत्यू झाला. ही घटना फत्तेपूर ता. जामनेर येथे सोमवारी सकाळी १० वाजता घडली. ऐन दीपावलीच्या दिवशीच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. यातील एक जण झिरो वायरमन आहे.
गणेश प्रकाश नेमाडे (४५, रा. कन्हाळा ता. भुसावळ) आणि सुनील भरतसिंग चव्हाण (४०, रा. टाकळी पिंप्री ता. जामनेर) अशी मृत वायरमनची नावे आहेत. गणेश हा अनुकंपाखाली नोकरीला लागला होता तर सुनील हा झिरो वायरमन होता.
फत्तेपूर गावानजीक एका शेतात खांबावरील तार खाली पडल्याचा निरोप आल्याने गणेश आणि सुनील हे तिथे पोहचले. या तारेला हात लावताच गणेश याला शॉक लागला आणि तो जागीच ठार झाला. तर दवाखान्यात नेत असतानाच सुनील याचा रस्त्यात मृत्यू झाला. गणेश याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"