अमळनेर येथे बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By Admin | Updated: May 11, 2017 16:36 IST2017-05-11T16:36:50+5:302017-05-11T16:36:50+5:30
दोघ जखमींना धुळ्याला हलविले
अमळनेर येथे बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
>अमळनेर,दि. 11- बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास पिंपळे आश्रमशाळेजवळ झाला.
सुनील निंबा चौधरी (35), पिंटू भिल (25), संजय भगवान भिल (26) हे तिघे जण दुचाकीवर जात होते. त्याचवेळी जवखेडय़ावरून अमळनेरकडे येणा:या बसची दुचाकीला धडक बसली. यात सुनील चैाधरी याला जबर मार लागल्याने, त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघांवर अमळनेर ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.