जामिनावर सुटताच लांबविली दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:16 IST2021-04-11T04:16:28+5:302021-04-11T04:16:28+5:30

क्राईम :औरंगाबादच्या सराईत गुन्हेगाराला अटक फोटो जळगाव : औरंगाबाद जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार मजहर शेख गुलाम (वय २२ रा. ...

The two-wheeler was released on bail | जामिनावर सुटताच लांबविली दुचाकी

जामिनावर सुटताच लांबविली दुचाकी

क्राईम :औरंगाबादच्या सराईत गुन्हेगाराला अटक

फोटो

जळगाव : औरंगाबाद जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार मजहर शेख गुलाम (वय २२ रा. जवाहर नगर, औरंगाबाद) यास एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी चोरीच्या दुचाकीसह अटक केली. त्याच्याकडील दुचाकी ही त्याने औरंगाबाद जिल्ह्यातील आसेगाव येथून चोरल्याची कबुली दिली असून त्याला सायंकाळी औरंगाबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. दरम्यान, मजहर याने जामिनावर सुटताच चोरी केल्याचे उघड झाले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील आसेगाव येथील भाऊसाहेब शाहुबा पल्हाळ (वय ४८) यांची दुचाकी (क्र. एमएच २० एफएल ९८८५) लांबविल्याची घटना ६ एप्रिल रोजी समोर आली होती. याप्रकरणी औरंगाबाद शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे. ही दुचाकी संशयित मजहर शेख गुलाम याने लांबविल्यानंतर तो जळगावात आला. मास्टर कॉलनीत फिरत असतांना गस्तीवरील एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, किशोर पाटील, मुकेश पाटील, गणेश शिरसाळे यांच्या पथकाने मजहर यास अटक केली.

* * * * * * * * *आठ दिवसांपूर्वीच जामिनावर सुटला*

संशयित मजहर याच्यावर औरंगाबादमधील जवाहर नगर, उस्मानपुरा यांच्यासह अहमदनगर, वैजापूर याठिकाणी अनेक घरफोडीचे व इतर गुन्हे दाखल आहेत. आठ दिवसांपूर्वीच त्याला औरंगाबाद येथे घरफोडीच्या गुन्ह्यात जामीन मिळाला. कारागृहाच्या बाहेर आल्यावर त्याने आसेगाव येथून दुचाकी चोरली. व तिच्यावर तो चोरीच्या उद्देशाने तो जळगावात आल्याची माहिती मिळाली आहे.

Web Title: The two-wheeler was released on bail