आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२८ : उमाळा शिवारातील रुख्मा इंडस्ट्रीज या कंपनीत लोखंडी पाईपाची चोरी करताना मोहन पांडूरंग अंबुरे (वय ३८ रा.हनुमान नगर, जळगाव) व प्रकाश महेंद्रलाल शर्मा (वय ३२ रा.आयोध्या नगर, जळगाव) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. बंद पडलेल्या कंपनीत चोरी होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक अनिरुध्द अढाव यांना मिळाली होती. त्यानुसार अढाव यांनी उपनिरीक्षक निलेश सोळंके, सहायक फौजदार अतुल वंजारी व शरद भालेराव यांचे पथक तातडीने रवाना केले असता मोहन व प्रकाश दहा हजार रुपये किमतीचे लोखंडी पाईप मालवाहू रिक्षातून घेऊन जात असताना आढळून आले. दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळील रिक्षाही (क्र.एम.एच.०४ ई९६६७) जप्त करण्यात आली असून त्यांच्याविरुध्द राहूल गुलाबराव पाटील यांच्या फिर्यादीवरुन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, दोन्ही चोरट्यांना बुधवारी न्या.बी.डी.गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास सहायक फौजदार अतुल वंजारी करीत आहेत.
जळगावात बंद पडलेल्या कंपनीत चोरी करताना दोघांना रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 20:31 IST
उमाळा शिवारातील रुख्मा इंडस्ट्रीज या कंपनीत लोखंडी पाईपाची चोरी करताना मोहन पांडूरंग अंबुरे (वय ३८ रा.हनुमान नगर, जळगाव) व प्रकाश महेंद्रलाल शर्मा (वय ३२ रा.आयोध्या नगर, जळगाव) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले.
जळगावात बंद पडलेल्या कंपनीत चोरी करताना दोघांना रंगेहाथ पकडले
ठळक मुद्दे एमआयडीसी पोलिसांची कारवाई दोघं चोरट्यांना एक दिवस पोलीस कोठडी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त