अयोध्या नगरात विद्युत तारांवर दोन झाडे कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:22 IST2021-08-19T04:22:39+5:302021-08-19T04:22:39+5:30
अयोध्या नगरातील महावितरणच्या ११ केव्ही विद्युत वाहिनीवर बुधवारी मध्यरात्री लिंबाची दोन मोठी झाडे अचानक कोसळली. यामुळे अयोध्या नगरसह ही ...

अयोध्या नगरात विद्युत तारांवर दोन झाडे कोसळली
अयोध्या नगरातील महावितरणच्या ११ केव्ही विद्युत वाहिनीवर बुधवारी मध्यरात्री लिंबाची दोन मोठी झाडे अचानक कोसळली. यामुळे अयोध्या नगरसह ही विद्युत वाहिनी पुढे बळिराम पेठेत येत असल्यामुळे, बळिराम पेठेतील वीज पुरवठाही खंडित झाला होता. घटनेची माहिती मिळतात महावितरणचे अयोध्या नगरातील अभियंता सुरेश पांचगे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासून युद्ध पातळीवर कामाला सुरुवात केली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने तुटलेली ही दोन्ही झाडे हटवून, दुपारी बारापर्यंत वीज पुरवठा सुरळीत केला. तसेच बुधवारी दुपारी या भागात एका फिडरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा प्रकार घडला. यामुळे दोन तासाने वीज पुरवठा सुरळीत झाला. तसेच शिव कॉलनी, मेहरूण, सुप्रिम कॉलनी, आदर्श नगर, पिंप्राळा या भागातही ब्रेकडाऊन होऊन वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले. यामुळे नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.