गुरे घेऊन जाणारे दोन छोटे वाहन केले जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:31 IST2019-03-01T00:31:10+5:302019-03-01T00:31:28+5:30

पारोळा : कत्तलीसाठी गुरे वाहणारे दोन छोटे वाहन येथे २७ रोजी तरुणांनी पकडून ते पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत पारोळा ...

Two small vehicles carrying cattle were seized | गुरे घेऊन जाणारे दोन छोटे वाहन केले जप्त

गुरे घेऊन जाणारे दोन छोटे वाहन केले जप्त

पारोळा : कत्तलीसाठी गुरे वाहणारे दोन छोटे वाहन येथे २७ रोजी तरुणांनी पकडून ते पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२७ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील एका हॉस्पिटलजवळ अवैधरित्या दोन छोट्या वाहनांनी गुरे कत्तलीसाठी घेऊन जात होते. त्यावेळी त्यांना पारोळा येथील विनोद खडे, नितीन बारी, गोरख चौधरी आदींनी त्यांना पकडून पारोळा पोलिसांच्या स्वाधीन केले.
याबाबत गुरुवारी मजीद खान फरीद खान पठाण रा.धरणगाव, भाऊसाहेब भानुदास पाटील (रा.नगाव), ज्ञानेश्वर केशव माळी (रा. बाबळेनाग) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपास पोहेकॉ नाना पवार करीत आहे.

Web Title: Two small vehicles carrying cattle were seized

टॅग्स :Jalgaonजळगाव