पारोळ्यात दोघा बहिणींचा तलावात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 00:58 IST2020-09-06T00:56:52+5:302020-09-06T00:58:59+5:30
पोपट्या तलावात कपडे धुण्यासाठी गेले असताना झालेल्या दुर्घटनेत दोन बहिणींचा बुडून मृत्यू झाला.

पारोळ्यात दोघा बहिणींचा तलावात बुडून मृत्यू
पारोळा, जि.जळगाव : येथील सिद्धार्थ नगरमधील रहिवाशी असलेले शेख रशीद शेख सुलेमान यांच्या कुटुंबातील सदस्य धरणगाव रोडजवळील पोपट्या तलावात कपडे धुण्यासाठी गेले असताना झालेल्या दुर्घटनेत दोन बहिणींचा बुडून मृत्यू झाला. या घटनेत तिसरी बहिण, आई आणि भावाला वाचविण्यात यश आहे
पारोळा येथील तायराबी शेख रशीद (५२) व त्यांच्या ३ मुली गुलनाजबी शेख रशिद (१६),शेख रुखसार शेख रशीद (१४), साहिरबी शेख रशिद (१२) व मुलगा शेख इबाहीम शेख (१०) असे पाच जण धरणगाव रोड लगत असलेल्या पोपट्या तलावावर शनिवारी दुपारी २ ते २.३० च्या दरम्यान कपडे धुण्यासाठी गेले होते. या दरम्यान लहान भावाने कपडे धुण्याची थोपटणी पाण्यात फेकली. ती काढण्यासाठी एकापाठोपाठ एक दोन्ही बहीण पाण्यात उतरली. त्यात गुलनाजबी व रुखसारबी या दोन्ही बहिणींचा तलावात बुडून मृत्यू झाला. तर सुदैवाने आई व दोन मुले यातून वाचले. गरीब कुटुंबावर हा मोठा आघात झाल्याने संपूर्ण परिसर शोक व्यक्त होत आहे.