रिक्षा व दुचाकीच्या अपघातात दोन गंभीर जखमी
By Admin | Updated: May 27, 2017 13:10 IST2017-05-27T13:10:51+5:302017-05-27T13:10:51+5:30
आशिया महामार्गावरील फुलगाव फाटय़ाजवळ अॅपेरिक्षा व दुचाकी यांचा शनिवारी दुपारी 12.20 वाजता अपघात झाला.

रिक्षा व दुचाकीच्या अपघातात दोन गंभीर जखमी
ऑनलाईन लोकमत
वरणगाव, दि.27- आशिया महामार्गावरील फुलगाव फाटय़ाजवळ अॅपेरिक्षा व दुचाकी यांचा शनिवारी दुपारी 12.20 वाजता अपघात झाला. यात चार जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.
मुक्ताईनगरकडून भुसावळकडे जात असलेली दुचाकी एमएच 19 सीए 551 हिला समोरून येणारी अॅपे रिक्षा एमएच 19 ए एक्स 1445 ने जोरात धडक दिली. यात दुचाकीस्वार शशिकांत मनोहर तायडे व राहुल गौतम सपकाळे (दोघे रा.तांदलवाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर अॅपे रिक्षातील सरला सुरेश तायडे (रा.पिंपरिसेकम) व दीड वर्षाचा बालक ललित हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविले आहे.