अपघातातील दोघा गंभीर तरुणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 22:13 IST2020-06-16T22:13:16+5:302020-06-16T22:13:56+5:30
यावल : जळगावी हलवितानाच सोडले प्राण

अपघातातील दोघा गंभीर तरुणांचा मृत्यू
यावल : येथील भुसावळ मार्गावर सोमवारी रात्री झालेल्या मोटरसायकलच्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. यामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
बोरावल गेट परिसरातील पुंडलीक चंद्रकांत सोनवणे (वय १९) व भुसावळ येथील त्याचा मावसभाऊ रोशन कैलास सोनवणे हे दोघे सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास भुुसावळवरून मोटर सायकलने (एमएच १९- डीएल ३०६७) यावलला येत असतांना शहरापासुन दोन किलोमिटर लांब अंतरावर अपघात होवून ते दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर येथील रुग्णालयात प्रथमोपचारानंतर करुन जळगाव येथे पाठविण्यात आले मात्र तेथे पोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला. मंगळवारी त्यांच्यावर यावल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पुंडलीक सोनवणे याचे पश्चात एक भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. तर रोशन हा एकुलताएक मुलगा होता. त्याच्या पश्चात दोन बहिणी व आई -वडील आहेत.