अमळनेर नगरपालिकेकडून दोन क्विंटल प्लॅस्टिक पिशव्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 17:24 IST2017-09-20T17:24:11+5:302017-09-20T17:24:52+5:30

अमळनेर,दि.20 - महात्मा गांधी शॉपिंग सेंटर मधील अरिहंत प्लॅस्टिक विक्री करणा:या दुकानावर बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने धाड टाकत दोन क्विंटल प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या.

Two quintal plastic bags were seized from Amalner municipality | अमळनेर नगरपालिकेकडून दोन क्विंटल प्लॅस्टिक पिशव्या जप्त

अमळनेर नगरपालिकेकडून दोन क्विंटल प्लॅस्टिक पिशव्या जप्त

ऑनलाईन लोकमत
अमळनेर,दि.20 - महात्मा गांधी शॉपिंग सेंटर मधील अरिहंत प्लॅस्टिक विक्री करणा:या दुकानावर बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने धाड टाकत दोन क्विंटल प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या.
बाजारपेठेतील महात्मा गांधी शॉपिंग सेंटर मधील कैलास सुभाषचंद्र जैन यांच्या अरिहंत प्लॅस्टिक या दुकानात बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बि:हाडे, अरविंद कदम, सत्यम संदानशिव, ज्ञानेश्वर संदानशिव,  गणेश संगेले, अनिल बाविस्कर यांच्या पथकाने धाड टाकत एक क्विंटल 78 किलोग्राम प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या. या दुकानातून यापूर्वीदेखील नगरपरिषदेने प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत. त्यावेळी दुकानदार जैन यांच्याकडून दोन हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला होता. मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुटे यांना याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 

Web Title: Two quintal plastic bags were seized from Amalner municipality