दुचाकी अपघातात चाळीसगावचे दोघे जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 16:00 IST2019-03-31T15:59:55+5:302019-03-31T16:00:08+5:30
देवळी-आडगाव फाट्याजवळील घटना

दुचाकी अपघातात चाळीसगावचे दोघे जागीच ठार
चाळीसगाव / आडगाव, जि. जळगाव : चाळीसगावहून मालेगावकडे दुचाकीवर जात असताना झालेल्या अपघातात वैभव देशमुख (गायकवाड) आणि अदित्य मधुकर वरसाळे, दोघे रा. हिरापूर रोड, चाळीसगाव हे दोघे तरुण जागीच ठार झाले. हा अपघात ३१ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील देवळी-आडगाव फाट्याजवळ झाला.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, वैभव देशमुख (गायकवाड) आणि अदित्य मधुकर वरसाळे हे दोघेजण कामानिमित्त दुचाकीने मालेगाव येथे जात होते. त्या वेळी देवळी आडगाव फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अपघात होऊन दोघे जण जागीच ठार झाले. दुचाकीला वाहनाने धडक दिली की एखाद्या झाडाला दुचाकी धडकली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला.
मयत वैभव देशमुख हे मोबाईल कंपनीत कामाला होते तर अदित्य वरसाळे यांचे चाळीसगाव येथे मोबाईल दुरुस्तीचे दुकान आहे.