दोन नवीन संशयित कोरोना कक्षात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 21:40 IST2020-03-25T21:39:55+5:302020-03-25T21:40:12+5:30

जळगाव - सरकारी रूग्णालयात बुधवारी दोन नवीन कोरोना संशयितांचे नमूने घेवून त्यांना कोरोना कक्षात दाखल करण्यात आले आहे़ आधी ...

 Two new suspects enter Corona's room | दोन नवीन संशयित कोरोना कक्षात दाखल

दोन नवीन संशयित कोरोना कक्षात दाखल

जळगाव- सरकारी रूग्णालयात बुधवारी दोन नवीन कोरोना संशयितांचे नमूने घेवून त्यांना कोरोना कक्षात दाखल करण्यात आले आहे़ आधी एक आणि बुधवारी दाखल झालेले दोन असे तीन संशयित सध्या कोरोना कक्षात दाखल आहेत.
कोरोना कक्षात नवीन दाखल झालेले संशयित हे एक जळगावातील तर दुसरा जामनेर येथील आहे़ दरम्यान, दोघेही काही दिवसांपूर्वी पुणे येथून परतले आहे़ दोघेंचेही नमूने घेतले असून अहवालाची प्रतीक्षा आहे़ दुसरीकडे याआधी घेण्यात आलेले संशयितांचा अहवाल हा निगेटीव्ह आल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

---------------------------------------------------

जळगाव जिल्ह्यातील कोरोना दृष्टीक्षेपात

- एकूण संशयित रूग्णांचे नमुने - 33
- रूग्णांचे प्राप्त अहवाल - 28
- प्रलंबित अहवाल - 03
- निगेटिव्ह अहवाल - 28
- नवीन संशयित दाखल - 02
- घरी सोडलेले रूग्ण - 28

Web Title:  Two new suspects enter Corona's room