जळगाव जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 08:30 IST2020-04-28T08:29:54+5:302020-04-28T08:30:13+5:30

जळगाव : मंगळवारी सकाळी  प्राप्त झालेल्या कोरोना  तपासणी अहवालानुसार जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ...

Two more corona infected patients were found in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव : मंगळवारी सकाळी  प्राप्त झालेल्या कोरोना  तपासणी अहवालानुसार जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी एक रूग्ण हा पाचोरा येथील 92 वर्षीय पुरूष आहे. तर एक अमळनेर येथील 90 वर्षीय महिला आहे. या दोन्ही रूग्णांचा अहवाल  येण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे 
पाचोरा येथील पुरूष रूग्णाचा दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झालेला आहे .तर अमळनेर येथील कोरोना बाधित महिलेचा काल मृत्यू झाला आहे.  
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या 24 झाली असून यापैकी नऊ रूग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली.

Web Title: Two more corona infected patients were found in Jalgaon district

टॅग्स :Jalgaonजळगाव