शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 11:34 IST

रावेरमधील गावांत जडीबुटी विक्रीसाठी आलेल्या हरयाणातील दोन साधूंना मुले चोरणारे समजून बेदम मारहाण करण्यात आली.

सावदा (जि. जळगाव) : जडीबुटी विक्रीसाठी आलेल्या हरयाणातील दोन साधूंना मुले चोरणारे समजून बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या चारचाकी वाहनाची तोडफोड करण्यात आली. ही घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास मुंजलवाडी, कुसुंबा आणि लोहारा (ता. रावेर) या तीन ठिकाणी घडल्या. या प्रकरणी सावदा पोलिसांत परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस वेळीच पोहोचल्याने पालघर घटनेची पुनरावृत्ती टळली आहे.

मंजुलवाडीमधील घटनेनंतर कारने कुसुंब्याकडे पळाले;  तेथेही ग्रामस्थांनी अडवून केली मारहाण, कारची तोडफोड केली. जस्सानाथ पुनुनाथ (वय ६०) आणि मोनुनाथ जस्सानाथ (२०, दोघे रा. सिरसा, हरयाणा) अशी या जखमी साधूंची नावे आहेत. हे साधू रविवारी सकाळी रावेर तालुक्यातील मुंजलवाडी गावात आले. त्यांनी गावात एका व्यक्तीची नाडी तपासणी केली. त्यानंतर तो व्यक्ती घरी गेला आणि काही वेळात इतर लोकांना घेऊन आला. त्यावेळी काही जणांना संशय आला. मुले पळवणाऱ्या टोळीतील असल्याच्या गैरसमजातून लोकांनी या दोन्ही साधूंना मारहाण करायला सुरुवात केली. मारहाण होताच या दोन्ही साधूंनी त्यांच्या चारचाकी वाहनातून पळ काढला. ते मंजुलवाडी येथून कुसुंब्याकडे पळाले; पण तिथे पोहोचताच स्थानिक रहिवाशांनी त्यांना अडविले आणि मारहाण करण्यास सुरूवात केली.

या मारहाणीत स्वत:ला वाचवत ते वाहनात कसेबसे बसले आणि लोहारा गावाकडे निघाले. तिकडे जात असताना साधूंच्या कारचा धक्का लागल्याने एकजण जखमी झाला. इथेही लोहारा येथील नागरिकांनी या दोघांना पकडून मारहाण केली, तसेच त्यांच्या चारचाकी वाहनाची तोडफोड केली. पोलिस लोहारा येथे घटनास्थळी पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.

पोलिसांत ३० ते ४० अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल याबाबत सावदा पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. लोहारा ( ता. रावेर) येथील इकबाल तडवी या तरुणाच्या फिर्यादीवरून दोन्ही साधूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे; तर जस्सानाथ पुनुनाथ यांच्या फिर्यादीवरून ३० ते ४० अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या दोन्ही जखमी साधूंवर सावदा रुग्णालयात उपचार करण्यात आले. आणखी मारहाणीचे प्रकार घडू नयेत, यासाठी त्यांना सावदा पोलिस ठाण्यात थांबवण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव