शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

फापोरे येथे भरदिवसा घरातून दोन लाखाचे सोन्याचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 22:35 IST

घराचे कुलूप उघडून सुमारे दोन लाखाचे ५० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना ३१ रोजी दुपारी २ वाजेदरम्यान फापोरे येथे घडली.

ठळक मुद्देअमळनेर : किल्लीने कुलूप उघडून चोराचे धाडस, चांदीचे दागिने तसेच सोडले

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : पती शेतात गेले असताना व पत्नी गावातच सांजोऱ्या लाटायला गेली असताना चोरट्याने घराचे कुलूप उघडून सुमारे दोन लाखाचे ५० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना ३१ रोजी दुपारी २ वाजेदरम्यान फापोरे येथे घडली.

तालुक्यातील फापोरे येथील किशोर युवराज पाटील हे ३१ रोजी सकाळी ९ वाजता शेतात निघून गेले होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी गावातील नातेवाईक अमृतराव पाटील यांच्या घरी सांजोऱ्या करण्यासाठी गेल्या, त्यावेळी त्यांनी घराला कुलूप लावून घराची किल्ली तुळशी वृंदावन खाली ठेवली. दुपारी ३ वाजेला त्या परत आल्यावर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसल्याने त्याना पती परत आले असतील असे वाटले. मात्र ते घरात आढळून आले नाही. म्हणून त्यांनी घरत अधिक शोधाशोध केली असता त्यांना त्यांच्या लोखंडी कपाटातील ३० हजाराचा  १० ग्रॅम सोन्याचा नेकलेस,  ३६ हजार रुपये किमतीची १२ ग्रॅमची सोनसाखळी, ६९ हजार रुपयांचा २३ ग्रॅम वजनाची सोनसाखळी, १२ हजार रुपये किमतीचा ४ ग्रॅम सोन्याचा तुकडा, साडेचार हजार रुपयांचा दीड ग्राम सोन्याचा तुकडा असे एकूण ५० ग्रॅम सोने एक लाख ८७ हजार ५०० रुपयांचे अज्ञात चोरट्याने चोरून नेले.

घटनेचे वृत्त समजताच पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. विशेष म्हणजे चोरट्याने घरातील वस्तू अस्ताव्यस्त करताना चांदीचे दागिने व इतर वस्तू याना हात न लावता त्या वस्तू तशाच पडू दिल्या. त्यामुळे चोरट्याचा फक्त सोने चोरण्याचा उद्देश असावा आणि लपवलेली किल्ली शोधून किल्लीने कुलूप उघडून चोरी केल्याने चोर परिचितांमधील असावा किंवा घरावर लक्ष ठेवून असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे   किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तपास सुभाष महाजन करीत आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेरThiefचोरCrime Newsगुन्हेगारी