लसीचे दोन लाख डोस आज सकाळीच मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:22 IST2021-09-17T04:22:11+5:302021-09-17T04:22:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाभरात कोविड प्रतिबंधक लसीचे दोन लाख डोस घेऊन आरोग्य विभागाचे वाहन पुणे येथून निघाले ...

लसीचे दोन लाख डोस आज सकाळीच मिळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात कोविड प्रतिबंधक लसीचे दोन लाख डोस घेऊन आरोग्य विभागाचे वाहन पुणे येथून निघाले असून, ते शुक्रवारी (दि. १७) सकाळीच जिल्ह्याला प्राप्त होणार असल्याची माहिती आहे. या डोसच्या नियोजनाबाबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना याबाबत सूचना दिलेल्या आहेत.
जिल्ह्यात अद्यापही ११ हजार डोस शिल्लक असून, सुमारे दोन लाख डोस जिल्ह्याला मिळणार असल्याची माहिती आहे. यातून प्रत्येक तालुक्याला दहा हजार डोस देण्यात यावे, असे एक नियोजन करण्यात येत आहे. मात्र परिस्थितीनुसार या डोसचे वाटप होणार असल्याची माहिती आहे.
जिल्हाभरात गुरुवारी ९४५५ नागरिकांनी लस घेतली. जिल्ह्यात १८ लाख २८ हजार ६७० नागरिकांनी लस घेतली आहे. यात आगामी दोन दिवसांत लसीकरणाचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.