जळगावात एसटीच्या धडकेत दोनजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:12 IST2021-06-23T04:12:28+5:302021-06-23T04:12:28+5:30

जळगाव : मागून आलेल्या एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने लीलाबाई धोंडू सोनार (वय ५५) व गजानन किसन बावस्कर ...

Two killed in ST collision in Jalgaon | जळगावात एसटीच्या धडकेत दोनजण ठार

जळगावात एसटीच्या धडकेत दोनजण ठार

जळगाव : मागून आलेल्या एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने लीलाबाई धोंडू सोनार (वय ५५) व गजानन किसन बावस्कर (वय ३२, दोन्ही रा. चिंचखेडा, ता. जामनेर) हे दोघेजण ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता औरंगाबाद महामार्गावर कुसुंबा गावाजवळ घडली.

लीलाबाई यांना मुतखड्याचा त्रास असल्याने त्या उपचारासाठी जळगावात आल्या होत्या. एका दुचाकीवर लीलाबाई व गजानन, तर दुसऱ्या दुचाकीवर लीलाबाई यांचा मुलगा योगेश ऊर्फ ज्ञानेश्वर धोंडू सोनार (वय ३०), बाळू धोंडू सोनार (वय ३५) व सुरेखा बाळू सोनार (वय ३३) हे असे तिघे जण होते. या अपघातात हे तिघे जण बालंबाल बचावले आहेत. या अपघातानंतर चालक बस सोडून पळून गेला.

योगेश व बाळू ही दोन्ही मुलं व सून सुरेखा या तिघांच्या डोळ्यासमोर आईचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेचा त्यांना प्रचंड धक्का बसला. गजानन हा योगेशचा जिवलग मित्र होता. एमआयडीसी पोलिसांनी बस ताब्यात घेतली आहे. मृत गजानन बावस्कर हा सुप्रीम कंपनीत कामाला होता.

Web Title: Two killed in ST collision in Jalgaon