पहूर येथील गोळीबार प्रकरणी संशयावरून दोघांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 21:48 IST2019-02-23T21:47:52+5:302019-02-23T21:48:02+5:30
सहा लाखांची चोरी

पहूर येथील गोळीबार प्रकरणी संशयावरून दोघांची चौकशी
पहूर, ता. जामनेर : येथील पंप कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून सहा लाख तीस हजाराची जबरीचोरी केल्या प्रकरणी पहूर पोलिसांनी दोन संशयित युवकांना ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र घटनेत या युवकांचा प्रत्यक्ष सहभाग आहे की नाही याची पडताळणी केली जात आहे.
सोमवार, १८ रोजी अजिंठा ट्रेडर्स पंपाचे कर्मचारी सहा लाख तीस हजाराचा भरणा जामनेर रोडवरील बँकेत भरण्यासाठी गेले असता दुचाकिवर आलेल्या तीन युवकांनी पंप कर्मचारी संजय पारखे व समाधान कुंभार यांना बंदुकिचा धाख दाखवून तोंडावर स्प्रे मारून सहा लाख तीस हजाराची जबरी चोरी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणात पहूर पोलिसांनी दोन संशयित युवकांना ताब्यात घेऊन शनिवारी दिवसभर चौकशी केली आहे.