शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कामायनी एक्स्प्रेसखाली दोघांचा मृत्यू; पत्नीला वाचविताना पती ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 11:30 IST

रूळ ओलांडणे बेतले जिवावर, पत्नीला वाचविताना पती ठार

लोकमत न्यूज नेटवर्क  पाचोरा (जि. जळगाव) :  रेल्वे रूळ ओलांडताना कामायनी एक्स्प्रेसखाली सापडून महिलेसह दोन जण ठार झाले. ही  हृदयद्रावक घटना पाचोरा-परधाडेदरम्यान रेल्वे वळण रस्त्यावर रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. यात पत्नीला वाचविताना पतीचा मृत्यू झाला आहे. 

रत्नाबाई माधवराव पाटील (६१, रा. दुसखेडा, ता. पाचोरा) आणि अशोक झेंडू पाटील (६०, रा. पहाण, ता. पाचोरा), अशी मृतांची नावे आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, परधाडे, ता. पाचोरा येथे सप्ताहानिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम होता. तो आटोपून रत्नाबाई पाटील,  अशोक पाटील व त्यांची पत्नी बेबाबाई पाटील, असे तीन जण परधाडेहून दुसखेडा गावाकडे जवळच्या मार्गाने पायीच निघाले होते. परधाडे- पाचोरा रेल्वे रूळ ओलांडताना अचानक मुंबईकडे जाणाऱ्या कामायनी एक्स्प्रेसखाली सापडून रत्नाबाई व अशोक पाटील हे दोघे जागीच ठार झाले. तत्पूर्वी,  रेल्वे येत असल्याचे लक्षात येताच अशोक पाटील यांनी त्यांच्या पत्नीस तत्काळ बाजूला सारल्याने त्यांच्या पत्नी बचावल्या आहेत. डोळ्यादेखतच पतीचा अपघात पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली.

मृतदेह दोन तास तसेच पडून  ही घटना घडल्यानंतर मृतदेह दोन तास घटनास्थळीच पडून होते. पाचोरा पोलिस स्टेशनला घटनेची माहिती उशिरा मिळाली.  खासगी रुग्णवाहिकाचालक अमोल पाटील, किशोर लोहार, बबलू मराठे यांनी घटनास्थळी जात  मृतदेहांची जुळवाजुळव करून ते पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणले होते.

 

टॅग्स :Jalgaonजळगावrailwayरेल्वेAccidentअपघात