शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष दाखवून दोन कोटीचा गंडा, आराेपीस सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:17 IST

जामनेर : पुणे येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तालुक्यातील चौघांना १ कोटी ९६ लाख ५० ...

जामनेर : पुणे येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तालुक्यातील चौघांना १ कोटी ९६ लाख ५० हजारात गंडा घालणाऱ्या शेख हुसनोद्दीन शेख चांद (वाळकी, जि. अहमदनगर) यास न्यायाधीश सचिन हवेलीकर यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

शेख हुसनोद्दीन व त्याच्या सहकाऱ्यांनी पंकज अर्जुन चौधरी (शेंदुर्णी), विनोद तुकाराम वाघ (जांभोळ), रायदास शंकर आस्कर (शेरी) व धनराज कैलास थोटे (वाकडी) यांना पुणे येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून खोटे व बनावट कॉल लेटर व कॉल लिस्ट तयार केली. नोकरीला लावून देण्यासाठी वेळोवेळी १ कोटी ९६ लाख ५० हजाराची रक्कम उकळली. नोकरीस न लावता व घेतलेले पैसे परत न करता व त्यांना न वटणारे धनादेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी ५ मार्च २०१८ रोजी पहूर पोलिसांनी भादंवि कलम ४६८, ४७१, ४२०, ४०६, ३४४, ५०६ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल होता.

तब्बल तीन वर्षांनी खटल्याचा निकाल लागला. सरकार पक्षाकडून १२ साक्षीदार तपासण्यात आले. औरंगाबाद गुन्हे शाखेतील सहायक दस्तऐवज परीक्षक संतोष कान्हेरे यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अनिल सारस्वत यांनी काम पाहिले. त्यांना हवालदार मोहन पाथरकर, नीलेश सोनार यांनी मदत केली.