धुपी गावात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन मुले जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 21:49 IST2018-09-14T21:47:45+5:302018-09-14T21:49:51+5:30
तालुक्यातील धुपी गावात पिसाळलेल्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन अल्पवयीन मुले जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.

धुपी गावात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन मुले जखमी
ठळक मुद्देघराबाहेर खेळत असताना केला हल्लासौरभ पाटील याच्या डाव्या डोळ्याजवळ चावाधुळे येथील सरकारी दवाखान्यात उपचार
अमळनेर : तालुक्यातील धुपी गावात पिसाळलेल्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन अल्पवयीन मुले जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.
सौरभ प्रमोद पाटील (वय ८) जयेश रवींद्र पाटील (वय २:५ वर्ष) हे घराबाहेर खेळत असताना दुपारी ४ वाजता एका पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला करीत त्यांना जखमी केले. यात सौरभ याच्या डाव्या डोळ्यावर चावा घेतला तर जयेश याच्या कपाळावर चावा घेतला. त्यांना उपचारासाठी अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. याठिकाणी प्रथमोपचार करीत पुढील उपचारासाठी धुळे येथील सरकारी दवाखान्यात हलविल्यात आले आहे.