भुसावळात पुन्हा दोन दुचाकी जाळल्या

By Admin | Updated: May 22, 2017 12:58 IST2017-05-22T12:58:40+5:302017-05-22T12:58:40+5:30

भुसावळतील पी़ओ़एच़कॉलनीत सोमवारी पहाटे दोन दुचाकी जाळण्यात आल्याचा प्रकार उघड झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आह़े

Two bikes were burnt again in the past | भुसावळात पुन्हा दोन दुचाकी जाळल्या

भुसावळात पुन्हा दोन दुचाकी जाळल्या

 भुसावळ,दि.22- शहरातील पी़ओ़एच़कॉलनीत सोमवारी पहाटे दोन दुचाकी जाळण्यात आल्याचा प्रकार उघड झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आह़े 

रेल्वेतील गार्ड कमलेश सिंग हे केंद्रीय विद्यालयाजवळील क्वार्टर क्रमांक आऱबी़-2 मध्ये राहतात़ कुटुंब झोपले असतानाच सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास अज्ञात इसमाने पेट्रोल बाटलीत आणून दोन दुचाकींना आग लावून दिल्याने सुमारे एक लाखांचे नुकसान झाल़े या प्रकरणी शहर पोलिसात दुपार्पयत गुन्हा दाखल झालेला नव्हता़
दरम्यान, या भागात गेल्या काही दिवसांपासून दुचाकींचे पेट्रोल चोरी होणे तसेच दुचाकी चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आह़े

Web Title: Two bikes were burnt again in the past