गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, सव्वा लाख रुपयांचा गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 15:05 IST2021-02-11T15:05:00+5:302021-02-11T15:05:37+5:30
रांजणगाव फाट्याजवळ चारचाकी वाहनातून गांजाची वाहतूक करणार्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, सव्वा लाख रुपयांचा गांजा जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : तालुक्यातील रांजणगाव फाट्याजवळ चारचाकी वाहनातून गांजाची वाहतूक करणार्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचेकडून एक लाख २६ हजार रुपयांचा गांजा तर कार पोलीसांनी जप्त केली आहे.
चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संजय ठेंगे यांना मध्य प्रदेशातून एका कारमधून शस्त्रे आणि अवैध दारू याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पथकाने सापळा लावला. यात रांजणगाव फाट्याजवळ धुळ्याकडून औरंगाबाद येथे जाणाऱ्या कारला (एमपी-०९/सीएन ५६९५) अडवून तपासणी करण्यात आली. या कारमध्ये ८ किलो ४०० ग्रॅम वजनाइतका गांजा आढळून आला.
पोलिसांनी भिका उर्फ सिंगम इजम शिसोदिया (१९, इंद्रपूर, बडवानी, मध्यप्रदेश) आणि पप्पू अंगाशिया जमरे (२५,तलाव फलीया, जि. बडवानी, मध्यप्रदेश) या दोघांना अटक करण्यात आली. हा गांजा १ लाख २६ हजार रूपयांचा असून कारसह इतर एकूण ४ लाख ८८ हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर अधिक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक संजय ठेंगे, उपनिरिक्षक संपत आहेर, हवालदार युवराज नाईक, नंदलाल परदेशी, नितीश पाटील, नितीन आमोदकर, शांताराम पवार, भूपेश वंजारी, गोकुळ सोनवणे, प्रेमसिंग राठोड, बिभीषण सांगळे व हेमंत दुसाने यांच्या पथकाने केली.