तरुणावर हल्ला करणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:12 IST2021-06-18T04:12:57+5:302021-06-18T04:12:57+5:30
जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे २७ फेब्रुवारी रोजी दीपक उर्फ नीलेश गोपाळ कोळी (वय २४) या तरुणावर काठ्या व ...

तरुणावर हल्ला करणाऱ्या दोघांना अटक
जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे २७ फेब्रुवारी रोजी दीपक उर्फ नीलेश गोपाळ कोळी (वय २४) या तरुणावर काठ्या व शस्त्राने हल्ला केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या अमर भास्कर सोनवणे (वय २०) व सागर मधुकर कांडेलकर (वय २४) दोन्ही रा.कुसुंबा या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी अटक केली.
कुसुंबा येथे गावठी दारु विक्रेत्यांवर कारवाई
जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी सायंकाळी गावठी दारू अड्ड्यावर धाड टाकली. त्यात कृष्णा रघुनाथ भालेराव (२०) व सुनील भास्कर कोळी (४१) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दीड हजार रुपये किमतीची ३० लीटर दारु हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक विशाल सोनवणे सतीश गरजे गफुर तडवी व सिद्धेश्वर डावकर आदींनी ही कारवाई केली.