वारंटमधील फरार दोन आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 21:12 IST2019-11-03T21:11:37+5:302019-11-03T21:12:39+5:30

न्यायालयाच्या आदेशाने त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.

Two accused absconding in warrant | वारंटमधील फरार दोन आरोपींना अटक

वारंटमधील फरार दोन आरोपींना अटक

जळगाव : न्यायालयात तारखांवर हजर न झाल्याने वॉरंट बजाविण्यात आलेल्या तिलक उर्फ टिल्लू पन्नालाल सासर (३०, रा. गुरुनानक नगर) व सुभाष बन्सी बारी (५०, रा. बुनगरवाडा, जुने जळगाव) या दोघांना शनी पेठ पोलिसांनी अटक केली. न्यायालयाच्या आदेशाने त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.
तिलक पन्नालाल सासर याच्याविरोधात २०१८ मध्ये आर्मअ‍ॅक्टचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो न्यायालयात हजर होत नसल्याने त्याचे वॉरंट काढण्यात आले होते. या वॉरंटनुसार त्याला शुक्रवारी राहत्या घरुन ताब्यात घेण्यात आले. तर दुसऱ्या घटनेत सुभाष बन्सी बारी याच्याविरोधात यावल पोलीस ठाण्यात भादवि ४९८ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात विवाहितेला खावटी दिली नाही, तसेच न्यायालयातही हजर न झाल्याने त्याचे वाँरट काढण्यात आले. शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक पवार,प्रशांत देशमुख,नाईक रवींद्र भालेराव यांनी ही कारवाई केली.

Web Title: Two accused absconding in warrant

टॅग्स :Jalgaonजळगाव