Twice subsidy to 75 farmers in Mahindra | महिंदळेत ७५ शेतकऱ्यांना दोनदा अनुदान

महिंदळेत ७५ शेतकऱ्यांना दोनदा अनुदान


महिंदळे ता. भडगाव : येथील७५ शेतकऱ्यांना नुकसानीचे अनुदान दोनदा प्राप्त झाले तर अनेकांना एकदाही मिळालले नाही. तहसील कार्यालयास आपला हा भोंगळ कारभार लक्षात येताच दोनदा अनुदान मिळालेल्या शेतकºयांना अनुदान परत करण्याच्या नोटीस दिल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाने शेतकºयांना महाचक्रीवादळामुळे व अवेळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त शेतकºया २०१९ चे अनुदान दिले. परंतु भडगाव तहसील कर्मचाºयांच्या हलगर्जी पणामुळे अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. उलट बाब म्हणजे अनेक शेतकºयांना या अनुदानाचा दोनदा लाभ मिळाला आहे. आता मात्र डबल गेलेले अनुदान परत मिळवण्यासाठी महिंदळे तलाठी यांनी शेतकºयांना कायदेशीर कारवाईच्या नोटिसा पाठवल्या आहेत. या नोटीस मध्ये अनुदान सात दिवसाच्या आत आपल्या बँक अकाऊंटला जमा न केल्यास आपल्या विरुद्ध म. ज. म. संहिता १९६६ च्या कलम १७४ अन्वये सदर रकमेच्या वसुलीकरिता कायद्यानुसार सक्तीची कार्यवाई करण्यात येईल किंवा ७/१२ उताºयावर बोझा दाखल करण्यात येईल, असे धमकविले आहे.
शेतकºयांनी खात्यात आलेले अनुदान काढून खर्च करून अनेक महिने उलटले. मात्र कर्मचाº्यांना या अनुदानाची आता माहिती झाली. दुसरीकडे अनेक शेतकरी मात्र अनुदानासाठी तहसीलच्या चकरा मारून मारून दमले. त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली जात आहे.महिंदळे येथील ७५ शेतकºयांच्या खात्यात दोनदा अनुदान आल्याचे कर्मचाºयांच्या निदर्शनास आले.
प्रतिक्रिया ......
आम्ही येथून पूर्ण शेतकºयांच्या बँक खात्याची माहिती तहसीलला पाठवून देतो. पैसे तेथून शेतकºयांच्या खात्यात जातात. परंतु अनावधानाने अनेक शेतकºयांच्या खात्यात डबल अनुदान गेले. ते अनुदान वसुलीसाठी शेतकºयांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. किती अनुदान गेले याची मला माहिती नाही.
- पूनम वरखडे, तलाठी महिंदळे

Web Title: Twice subsidy to 75 farmers in Mahindra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.