गलंगी स्थानक परिसरात आढळला बेवारस मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 23:08 IST2019-09-23T23:08:32+5:302019-09-23T23:08:36+5:30
चोपडा : तालुक्यातील गलंगी येथे बस स्थानक परिसरात पंकज इंदूरकर (वय ४०) या व्यक्तीचा मृतदेह आढळून आले. या घटनेने ...

गलंगी स्थानक परिसरात आढळला बेवारस मृतदेह
चोपडा : तालुक्यातील गलंगी येथे बस स्थानक परिसरात पंकज इंदूरकर (वय ४०) या व्यक्तीचा मृतदेह आढळून आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
हा मृतदेह बेवारस स्थितीत उपजिल्हा रुग्णालयात शवागारात ठेवले आहे. त्याची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
२३ रोजी पहाटे ५ वाजेपूर्वी येथील बस स्थानक परिसरातील चहाच्या हॉटेलवर मजुरीचे काम करणारा पंकज इंदूरकर या व्यक्तीचा मृतदेह आढळला. सदर व्यक्ती ब-याच वर्षांपासून या परिसरात राहत होता. मात्र त्याचे मूळ नाव, गाव याबाबत कोणालाही माहीत नव्हते. पोलीस पाटील सुनील देवराज यांच्या खबरीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.