प्रशिक्षणाच्या बॅनरवर मराठीचे बारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:22 IST2021-09-08T04:22:06+5:302021-09-08T04:22:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेकडून जिल्हाभरातील डॉक्टरांना कोविडचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासाठी जिल्हा ...

प्रशिक्षणाच्या बॅनरवर मराठीचे बारा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेकडून जिल्हाभरातील डॉक्टरांना कोविडचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासाठी जिल्हा परिषदेकडून नियोजन करण्यात येत आहे. मात्र, या प्रशिक्षणाच्या बॅनरवर मराठी शब्दांच्या अक्षम्य चुका झाल्याने शिबिरात हाच चर्चेचा विषय ठरला.
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत कार्यरत डॉक्टरांना कोविडचे औषधोपचार, व्हेंटिलेटर हाताळणी, ऑक्सिजन कसे लावावे, उपचार पद्धती कशी असावी, असे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. किशोर इंगोले, औषध वैद्यक शास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. विजय गायकवाड, जनऔषध वैद्यक शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. योगिता बावस्कर यांच्याकडून जिल्ह्यातील डॉक्टरांना प्रशिक्षण दिले जात आहे. दहा दिवस हे प्रशिक्षण वर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरू राहणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पोटोडे, वैद्यकीय अधिकारी तुषार देशमुख, जयश्री दंडगव्हाळ, सुनील शिंदे, योगेश वाणी, आदी उपस्थित होते.