एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे उद्यापासून तुकाराम बीज सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 14:37 IST2020-03-02T14:36:00+5:302020-03-02T14:37:06+5:30

संतश्रेष्ठ जगतगुरू तुकाराम महाराज बीज सप्ताह दि ४ मार्चपासून येथे सुरू होत आहे.

Tukaram Seed Week starting tomorrow at Kasoda in Erandol taluka | एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे उद्यापासून तुकाराम बीज सप्ताह

एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे उद्यापासून तुकाराम बीज सप्ताह

ठळक मुद्देइंदुरीकरांच्या पत्नी कासोद्यातशालिनी देशमुख यांच्या कीर्तनाविषयी उत्सुकता

कासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : संतश्रेष्ठ जगतगुरू तुकाराम महाराज बीज सप्ताह दि ४ मार्चपासून येथे सुरू होत आहे. सध्या चर्चेत असलेल्या इंदुरीकर महाराजांच्या पत्नी ह.भ.प.शालिनी देशमुख या कासोद्यात येत असून, सप्ताहात त्यांचे पहिलेच कीर्तन होणार आहे. त्या नेमके काय बोलतात, याबाबत भाविकात उत्सुकता आहे.
५ रोजी हभप.बाबासाहेब इंगळे बीड, दि.६ रोजी हभप.सूर्यभान महाराज शेळगावकर, दि.७ रोजी हभप. सोपान सानप हिंगोली, दि. ८ रोजी हभप. लक्ष्मण पाटील आळंदी, दि.९ रोजी हभप.अक्रूर महाराज सकरे गेवराई, दि.१० रोजी हभप.रामरावजी ढोक नागपूर, दि.११ रोजी हभप. ज्ञानेश्वर माऊली शेलूदकर यांचे कीर्तन रात्री ९ ते ११ या वेळेत आठवडे बाजारातील जगदंबा माता मंदिराच्या समोरील जागेत होणार आहेत.
भाविकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, अशी विनंती हभप. संजय जमादार व सहकाऱ्यांंनी केली आहे.

 

Web Title: Tukaram Seed Week starting tomorrow at Kasoda in Erandol taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.