जळगाव : लाल रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी मॉर्निंग वाक करुन घरी येत असलेल्या अश्विनी पियुष दहाड (वय ३०, रा. जैन ओसवाल बोर्डींगसमोर, जळगाव) यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी लांबविण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सकाळी ७.१५ वाजता आंबेडकर मार्केट परिसरात घडली.दरम्यान, अश्विनी यांनी वेळीच सावरल्याने ही सोनसाखळी सुरक्षित राहिली. दुचाकीवरुन आलेले चोरटे सोनसाखळी लांबविताना सीसीटीव्ही कॅमेºयाद कैद झाले आहेत. अश्विनी दहाड या दररोज सकाळी सहा वाजता घरापासून स्वातंत्र्य चौक, काव्यरत्नावली चौक, डी मार्ट मार्गे मोहाडी रस्त्यावरील लांडोरखोरी उद्यानापर्यंत मॉर्निंग वॉकसाठी जातात. मंगळवारी तेथून परत येत असताना ही घटना घडली. आरडाओरड करण्याच्या आतच चोरट्यांनी धूम ठोकली. या घटनेने दहाड प्रचंड घाबरल्या आहेत. शहरात सलग चोरीच्या घटना घडत आहेत. दरम्यान, अश्विनी दहाड या रविवारी झालेल्या माहेश्वरी समाज मॅरेथॉन स्पर्धेत पहिल्या आल्या होत्या.
जळगावात सोनपोत लांबविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 16:49 IST
लाल रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी मॉर्निंग वाक करुन घरी येत असलेल्या अश्विनी पियुष दहाड (वय ३०, रा. जैन ओसवाल बोर्डींगसमोर, जळगाव) यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी लांबविण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सकाळी ७.१५ वाजता आंबेडकर मार्केट परिसरात घडली.
जळगावात सोनपोत लांबविण्याचा प्रयत्न
ठळक मुद्देआंबेडकर मार्केट परिसरातीलचोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदआरडाओरड केल्याने चोरट्यांनी ठोकली धूम