गायींची अवैध वाहतूक करणारा ट्रक पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:22 IST2021-08-20T04:22:25+5:302021-08-20T04:22:25+5:30
अमळनेरकडून हातेड रस्त्यावर घोडगाव फाट्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकमध्ये अवैधरीत्या गायी व वासरू कोंबल्याची माहिती हातेड येथील युवकांना मिळाली ...

गायींची अवैध वाहतूक करणारा ट्रक पोलिसांच्या जाळ्यात
अमळनेरकडून हातेड रस्त्यावर घोडगाव फाट्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकमध्ये अवैधरीत्या गायी व वासरू कोंबल्याची माहिती हातेड येथील युवकांना मिळाली त्यांनी ही माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना दिली होती. त्यानंतर गाडीची तपासणी केली असता त्यात दहा गायी व तीन वासरू कोंबलेल्या अवस्थेत आढळून आले.
अमळनेर ते हातेड रस्त्यावर घोडगाव फाट्याजवळ ही गाडी थांबवली असता, या आयशर गाडीमध्ये दोन लाख ५६ हजार रुपये किमतीच्या दहा गायी प्रत्येकी २४ हजार रुपये किंमत व तीन वासरू प्रत्येकी दोन हजार रुपये किंमत असे एकूण १३ जनावरे आयशर गाडीत विनापरवाना व अवैधरीत्या ट्रकचालक साजीद नूर मोहम्मद (२६, अलोद, ता. इंडोरी, जि. बुंदी) हा आढळला असून, त्याच्याविरुद्ध पोलीस नाईक रवींद्र वाघ यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.