नेरी टोल नाक्यावर बसची ट्रकला जोरदार धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 21:48 IST2018-10-08T21:47:23+5:302018-10-08T21:48:50+5:30

नेरी टोल नाक्यावर बसची ट्रकला जोरदार धडक
नेरी ता जामनेर : जळगाव-औरंगाबाद रस्त्यावरील टोल नाक्याजवळ दोन वाहनांमध्ये जबर धडक झाली.यात तीन जण जखमी झाले आहेत. अपघातात बसचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी दोन्ही वाहन चालकांना ताब्यात घेतले आहे.
सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पहुर कडून एपी १६, टीई ३२९४ ही मालवाहू ट्रक जळगावकडे जात असताना एमएच १४ बीटी २२४२ या जामनेर आगाराची बस ट्रक वर जोरदार आदळली. मात्र बसवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठ अनर्थ टळला. या अपघातात बस मधील तीन प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे. त्यांना तत्काळ प्राथमिक उपचारसाठी रवाना करण्यात आले. ट्रक चालक शेख चंदूलाल काशिम व बस चालक किशोर बोरसे यांना चौकशीसाठी जामनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.