भुसावळ रस्त्यावर विटांनी भरलेला ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 19:03 IST2018-04-10T19:03:27+5:302018-04-10T19:03:27+5:30
आशिया महामार्ग क्रमांक ४६ वर जळगाव कडून भुसावळ कडे जाणाऱ्या विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरला समोरून येणाºया भरधाव ट्रकने कट मारल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टर पलटी झाले.

भुसावळ रस्त्यावर विटांनी भरलेला ट्रक उलटला
आॅनलाईन लोकमत
भुसावळ,दि.१० : आशिया महामार्ग क्रमांक ४६ वर जळगाव कडून भुसावळ कडे जाणाऱ्या विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरला समोरून येणाºया भरधाव ट्रकने कट मारल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टर पलटी झाले. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील चौधरी मोटर्सच्यापुढे घडली. सुदैवाने यात कोणाला काहीही इजा झाली नाही.
सुरेश भोई यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. -१९ -पी-२९२४ हे विटा भरुन भुसावळकडे जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाºया अज्ञात ट्रकने कट मारल्याने चालक सुरेश भिल याचा वाहनावरील ताबा सुटला व ट्रॅक्टर पलटी झाले.
वाहतूक विस्कळीत
अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्गावर दोन्ही बाजुंनी दोन कि.मी. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
परिसर व साकेगावच्या तरुणांनी घटनास्थळ गाठून ट्रॅक्टर ट्रॉली उचलण्यास मदत केली. व वाहतूक सुरळीत करण्यासही मदत केली.