A truck crashed in Kannad Ghat, killing the driver | कन्नड घाटात ट्रक कोसळून चालक ठार

कन्नड घाटात ट्रक कोसळून चालक ठार

ठळक मुद्देदोघेजण गंभीर, अपघाताची पोलिसात नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : कर्नाटक येथून कडप्पा व ग्रॅनाईट घेवून सुरतकडे जात असलेला ट्रक कन्नड घाटात म्हसोबा मंदिराच्या पुढे वळण घेत असताना दरीत कोसळल्याने ट्रक चालक जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहे. ही घटना २२ रोजी रात्री घडली.

ट्रक चालक भिमाभाई आमरसी (सुरत) असे या मयताचे नाव आहे. ट्रकमधील लालजीभाई गोवर्धनभाई व अजयभाई भिमाभाई हे दोघे जखमी झाले आहे.
कन्नड घाटातून भरधाव वेगाने जाणारा ट्रक (जीजे २७-६०१२) म्हसोबा मंदिराच्या पुढे ओव्हरटेक करीत असताना ट्रक दरीत कोसळला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. 

पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: A truck crashed in Kannad Ghat, killing the driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.