जळगावात खुन्नस दिल्याच्या संशयावरुन ट्रकची तोडफोड
By Admin | Updated: April 16, 2017 17:34 IST2017-04-16T17:34:06+5:302017-04-16T17:34:06+5:30
चालकाला मारहाण. दुचाकीस्वाराने कट मारुन ट्रकला केला ओव्हरटेक

जळगावात खुन्नस दिल्याच्या संशयावरुन ट्रकची तोडफोड
जळगाव,दि.16- ट्रकला कट मारुन पुढे गेलेल्या दुचाकीस्वाराने आपल्याकडे खुन्नसने पाहून इशारा केल्याच्या संशयावरुन ट्रकच्या काचा फोडून चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजता महामार्गावर मानराज पार्कजवळ घडली. या घटनेत दुचाकीस्वार फरार झाला असून ट्रक रामानंद नगर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. जखमी ट्रक चालकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वरणगाव येथील चालक मुस्तफा खान जहांगीर खान (वय 25 ) हा तरुण ट्रक (क्र.एम.एच.18 एम.3723) घेऊन वरणगाव येथून बांभोरी येथील जैन इरिगेशन कंपनीत माल भरण्यासाठी जात असताना महामार्गावर मानराज पार्कजवळ समोरुन दुचाकीवर दोन जण आले. दोन्ही बाजूंच्या वाहनातून मार्ग काढून दुचाकीस्वार पुढे गेला. दोन्ही वाहनांच्या जात असताना कट लागला असता या उद्देशाने दुचाकीस्वाराने मागे फिरुन ट्रक चालकाला इशारा केला. त्यावर मुस्तफा खान यानेही बाहेर हात काढून दुचाकीस्वाराला इशारा केला. आपल्याला वाईट हेतून इशारा केल्याच्या संशयावरुन दुचाकीस्वार मागे फिरुन आला. मानराज चौकात थांबलेल्या दहा ते बारा जणांना बोलावून घेत ट्रकवर हल्ला केला. दोन्ही बाजुचे काच फोडून चालकाला खाली खेचले व बेदम मारहाण केली.