कन्नड घाटात ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:11 IST2021-06-19T04:11:51+5:302021-06-19T04:11:51+5:30
चाळीसगाव : कन्नड घाटात गुरुवारी ट्रकचे ब्रेक अचानक फेल झाल्याने ट्रक म्हसोबा देवस्थानच्या शेडला जाऊन धडकला. यात म्हसोबा देवस्थानच्या ...

कन्नड घाटात ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने
चाळीसगाव : कन्नड घाटात गुरुवारी ट्रकचे ब्रेक अचानक फेल झाल्याने ट्रक म्हसोबा देवस्थानच्या शेडला जाऊन धडकला. यात म्हसोबा देवस्थानच्या पत्री शेडचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला.
देव बलवत्तर होते, म्हणून ट्रक चालकाचे आज प्राण वाचल्याची चर्चा दिवसभर होती.
चाळीसगाव-औरंगाबाद महामार्गावर ट्रक (क्र.पीआय,जीएफ.०६८३) चाळीसगावकडे येत असताना अचानक ट्रकचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे ट्रक
रस्त्याच्या बाजूला असलेल्या व हजारो भक्तांची श्रद्धा असलेल्या म्हसोबा देवस्थानच्या पत्री शेडला जाऊन धडकला, यात पत्री शेडचे मोठ्या प्रमाणात
नुकसान झाले, परंतु सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. देवस्थान जर नसते, तर ट्रक खोल दरीत जाऊन पडला असता. ट्रक चालकाचे व इतरांचे प्राण गेले असते. म्हसोबा देवस्थान हे कन्नड घाटत स्थापन झाल्यापासून अस्तित्वात असून, घाटातून जाणारे वाहन चालक म्हसोबाचे दर्शन घेऊनच पुढे जातात. भक्तांच्या हाकेला म्हसोबा नेहमीच धावून जातो, याचा प्रत्यय आजही पुन्हा आल्याची चर्चा आहे.