फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : अवैध गौणखनिज कारवाईच्या 'नकला' आताच द्या, असे म्हणत डंपरमालकासह तिघांनी फैजपूर प्रांत कार्यालयात 'राडा' केला. दरम्यान, सरकारी कामात अडथळा आणून डंपरमालकाने कार्यालयातील दरवाजावर स्वत:चे डोके आपटले व आत्महत्येचा प्रयत्न केल्याने या तिघांविरुद्ध २२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून, ही घटना २१ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान घडली आहेयाप्रकरणी जळगाव येथील श्याम धोंडू सोनवणे तसेच बंटी व मॉन्टी पूर्ण नाव माहीत नाही. या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेपोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, गेल्या महिन्यात २४ नोव्हेंबर रोजी फैजपूर मंडळात अवैधरीत्या गौणखनिज वाहतूक करताना डंपर क्रमांक ३२६५ वर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. तो राग मनात असतानाच २१ डिसेंबर रोजी आरोपी श्याम सोनवणे तसेच त्याचे साथीदार बंटी व मॉन्टी हे गाडी सोडविण्यासाठी लागणाºयो नकला घेण्यासाठी आले. प्रांत कार्यालयात फिर्यादी तथा प्रांत कार्यालयातील चालक उमेश तळेकर यानेच डंपर पकडून दिले असल्याच्या संशयावरून त्याला शिवीगाळ केली. तसेच साक्षीदार पंकज टोलमारे यांच्या टेबलावर बंटी याने जोरात थापा मारत गाडीवरील कारवाईच्या नकला आता द्या, नाहीतर मी तुम्हाला कोणालाच कामकाज करू देणार नाही म्हणून दमदाटी केली तर डंपरमालक श्याम सोनवणे याने कार्यालयातील लाकडी दरवाजावर स्वत:चे डोके आदळून घेत मला मरायचे आहे, असे म्हणत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी उमेश तळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा तसेच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि प्रकाश वानखडे करीत आहे.
डंपरमालकासह तिघांचा फैजपूर प्रांत कार्यालयात राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 19:45 IST
अवैध गौणखनिज कारवाईच्या 'नकला' आताच द्या, असे म्हणत डंपरमालकासह तिघांनी फैजपूर प्रांत कार्यालयात 'राडा' केला.
डंपरमालकासह तिघांचा फैजपूर प्रांत कार्यालयात राडा
ठळक मुद्देडोके आदळून घेत केला आत्महत्येचा प्रयत्नतिघांविरुद्ध गुन्हा दाखल